Popular Posts

Monday, February 11, 2013

शुभं करोति कल्याणं

(दिवे लागण्याच्या वेळी / संध्याकाळी म्हणावयाचा श्लोक)


शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपद: |
शत्रुबुद्धीविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुsते | 


दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडले, मोतीहार |
दिव्याला देखून नमस्कार ||


ये गें लक्ष्मी बैस गें बाजे | अमुचे घर तुला साजे ||
तिळाचे तेल कापसाची वात | दिवा तेवे मध्यान् रात ॥


दिवा लागला तुळशीपाशी |
उजेड पडला विष्णूपाशी ||
माझा नमस्कार तेहतीस कोटि देवांशी |

झाडाझुडांनो दिवा पहा | एड टळो, पिडा टळो ||

घरातली पिडा बाहेर जावो | बाहेरची लक्ष्मी घरात येवो ||
घराच्या धन्याला, घरधनिणीला | उदंड औक्ष देवो || 

No comments:

Post a Comment