मी:
हे आहे व्यासपीठ, प्रत्येक मराठी माणसाचे. प्रगतीशील महाराष्ट्राचा अभिमान
बाळगणा-यांचे आणि आपल्या मराठीपणाच्या खुणा अभिमानाने दाखविणा-यांचे.
मला महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान तर आहेच, पण मराठी
माणसाविषयी बाळगल्या जाणा-या सा-या पूर्वग्रहांविषयी घृणाही आहे. हे
पूर्वगृह फक्त अमराठी समाजात आहेत असे नाही, ब-याचदा ते मराठी माणसांतही
दिसून येतात. त्यामुळेच, स्वतःविषयी नकारात्मक आणि आपल्या समाजाविषयी
उदासीन असलेल्या सा-यांनाच आम्ही सांगू इच्छितो की, मराठी माणूस बदललाय...,
मराठी समाज बदलतोय.... जुनाट नजरेतून त्यांच्याविषयी तुम्ही काही मते
बनवली असतील, तर आता ती टाकून द्या, डोळे उघडा आणि नीट बघा, नवेपणाने
समाजाच्या स्थित्यंतराकडे पहा.. तुम्हाला दिसेल मराठी माणसाची अबोल आगेकूच.
त्यात डामडौल नसेल, उथळ खळखळाट नसेल, पण प्रगतीचा प्रवाह निश्चित आहे.

विदेशात जाणा-या आणि तिथे यशस्वी होणा-या भारतीयांच्या यादीवर नजर टाकली
तरी मराठी माणसाच्या कर्तबगारीची प्रचिती आपल्याला येईल. अर्थात, अशी
प्रगती फक्त विदेशावर स्वारी करणा-यांनाच करता आली असे मात्र नाही.
मायभूमीशी असलेले नाते कायम ठेवून अनेकांनी कर्तबगारीची अशीच झेप घेऊन
दाखवली. कुणी मराठी मातीत केशर फुलवून दाखवला तर कुणी इथे रसरशीत फुले
फुलवून विदेशी मार्केटमध्ये नियमितपणे विकण्याचा मार्ग दाखवून दिला. कुणी
सुपर कंप्युटर बनवून दाखवला, कुणाची शँपेन पाश्चात्यांच्या सराईत
जिव्हाग्रांनाही समृद्ध करून गेली, आजघडीला असे एकही क्षेत्र नाही, ज्यावर
मराठी माणसांने आपल्या कर्तृत्वाची लखलखीत मुद्रा उमटवलेली नाही. मराठी
पावलांनी ज्या ज्या नव्या प्रदेशात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा
तेव्हा त्याची पावले आधी तिथे भक्कमपणे उभी राहिली आणि मग त्यांनी स्वतःची
अशी वेगळी ओळख निश्चितपणे निर्माण केली.
नव्या महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेचा आम्हाला अभिमान आहे आणि तीच पताका
खांद्यावर घेऊन मिरवण्याचे व्रत आम्ही घेतलेले आहे. अर्थात, हे करतानाही
तुकोबारायांची शिकवण आमच्या मनावर बिंबलेली आहे –
भले तो देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा
अस्सल मराठीपणाची हीदेखील एक खूण आहेच की! त्यामुळेच आमचाही निर्धार आहे,
समाजातील जे जे उत्तम, उदात्त आणि सुंदर आहे त्याची पाठराखण करण्याचा आणि
त्याचवेळी खोट्यांच्या कपाळी नेम धरून सोटा हाणण्याचाही.
अर्थात समाजाच्या हक्कासाठीच्या या लढ्यामध्ये सहभागी होताना तुमची साथही हवी.
No comments:
Post a Comment