Popular Posts

Sunday, November 13, 2011

अभिमान आहे मला मी पुणेकर असल्याचा.

पुण्यामध्ये काय आहे पाहण्यासारखं??

असा खोचक प्रश्न विचारणाऱ्या मित्रांना सांगावसे वाटते की-" बरोबर आहे, आमच्या पुण्यात

पाहण्यासारखं काहीच नाही जे आहे ते जाणून शिकण्यासाठी आहे, अन् जेवढे तुम्ही पुण्याच्या गोष्टी

नुसत्या कुतुहलाने न पाहता त्या जाणून अभ्यासण्याचा प्रयत्न करताल तेवढे त्याचे असंख्य अंतरंग

अलगद उलगडत जातील."


पैसा, प्रसिद्धी, विद्वत्ता या गोष्टी तर चारही दिशांना सारख्याच अगदी तोडीस तोड ! परंतु

याव्यतिरिक्त माणसातले माणूसपण अन् त्यातच देव शोधण्याची वृत्ती, स्वतःच्या संस्कृतीची पाये-

मुळे घट्ट रोवत उभा आहे माझा पुणेरी माणूस.

अशी माणसाला माणूसपण देणारी माणसे जर कोठे असतील ती फक्त पुण्यात, अन् अशा पुण्याचा

मी. अभिमान आहे मला मी पुणेकर असल्याचा. अन् म्हणूनच आम्ही म्हणतो "पुणे तिथे काय उणे."

तेव्हा माझ्या मित्रांनो, पुणे हे नुसते पाहू नका त्याला समजून घ्या. तर आणि तरचं कित्येक थोर

व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन पुण्याचं खरं सौंदर्य तुम्हांस चाखता येयील.

धन्यवाद..!!

Saturday, November 12, 2011

मराठी विश्वकोश


‎'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या 
संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच.
अधिक माहितीसाठी भेट द्या-

Thursday, October 27, 2011

माझी दिवाळी..!!

यावेळी मी प्रदूषणविरहित म्हणजेच पर्यावरणास पूरक अशी दिवाळी साजरी करणार आहे.....!!


आपण स्वतःलाच कित्ती फसवतो नाही...ओठांवर जरी हे वाक्य

असले तरी मनात मात्र उगाच मोठा झालो ही खंत असते.(आठवते

ते निरागस बालपण, दिवाळीच्या सुट्ट्या, दिवाळीत शिक्षकांनी दिलेला

अभ्यास[किती जण करायचे माहीत नाही], नवी कपडे, फटाके,

उनाडक्या इ.)


Monday, September 26, 2011

तर मग खरच मला प्रेम करता येत नाही....

तर मग खरच मला प्रेम करता येत नाही....
जिवापाड प्रेम करतो मी तिच्यावर,
म्ह् णून मला तिच्याशी तासनतास गप्पा वैगरे मारता येत नाही,
आणी ह्या गप्पा मारण्याला जर तुम्ही प्रेम म्ह् णत असाल,
तर मग खरच मला प्रेम करता येत नाही......

खुप सुन्दर आहेत तिचे डोळे..
चिंब होत माझ ह्रहय जेव्हा ती बघते माझ्याकडे,
म्ह् णुन मला त्याचा नशा वैगरे होत नाही,
आणी त्या नशा होण्याला जर तुम्हि प्रेम म्ह् णत असाल,
तर मग खरच मला प्रेम करता येत नाही......

रेशमाला लाझ वाटेल असे केस आहेत तीचे,
एक गुन्था शोधत असतो मी त्यात तास् नतास,
पण मी त्यात धुन्ध वैगरे होत अस मला वाटत नाही,
आणी ह्या धुन्ध होण्याला जर तुम्हि प्रेम म्ह् णत असाल,
तर मग खरच मला प्रेम करता येत नाही......

हे सर्व मी तिलाहि सान्गतो,
तिला माझा रागही येतो,
पण मला हे लपवता ही येत नाही,
आणी ह्या लपविण्याला जर तुम्हि प्रेम म्ह् णत असाल,
तर मग खरच मला प्रेम करता येत नाही......
-संग्रहित.

Sunday, March 27, 2011

शब्द...: राहुल गांधी म्हणजे ...

शब्द...: राहुल गांधी म्हणजे ...: "राहुल गांधी म्हणजे चाळीशीकडे झुकलेला तरुण. बापजाद्याच्या मोठेपणाच्या वारशावर खासदार एवढीच पात्रता. तरीही भावी पंतप्रधान. याउलट तामिळनाडूचे म..."

Tuesday, March 8, 2011

आलिया भोगासी...


लेख प्रकाशित: लोकसत्ता, १९ ऑगस्ट २०११.

Thursday, February 17, 2011

अभिमान..



मी: 
हे आहे व्यासपीठ, प्रत्येक मराठी माणसाचे. प्रगतीशील महाराष्ट्राचा अभिमान 
बाळगणा-यांचे आणि आपल्या मराठीपणाच्या खुणा अभिमानाने दाखविणा-यांचे.
मला महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान तर आहेच, पण मराठी 
माणसाविषयी बाळगल्या जाणा-या सा-या पूर्वग्रहांविषयी घृणाही आहे. हे 
पूर्वगृह फक्त अमराठी समाजात आहेत असे नाही, -याचदा ते मराठी माणसांतही 
दिसून येतात. त्यामुळेच, स्वतःविषयी नकारात्मक आणि आपल्या समाजाविषयी 
उदासीन असलेल्या सा-यांनाच आम्ही सांगू इच्छितो की, मराठी माणूस बदललाय...,
मराठी समाज बदलतोय.... जुनाट नजरेतून त्यांच्याविषयी तुम्ही काही मते 
बनवली असतील, तर आता ती टाकून द्या, डोळे उघडा आणि नीट बघा, नवेपणाने 
समाजाच्या स्थित्यंतराकडे पहा.. तुम्हाला दिसेल मराठी माणसाची अबोल आगेकूच.
त्यात डामडौल नसेल, उथळ खळखळाट नसेल, पण प्रगतीचा प्रवाह निश्चित आहे.

विदेशात जाणा-या आणि तिथे यशस्वी होणा-या भारतीयांच्या यादीवर नजर टाकली 
तरी मराठी माणसाच्या कर्तबगारीची प्रचिती आपल्याला येईल. अर्थात, अशी 
प्रगती फक्त विदेशावर स्वारी करणा-यांनाच करता आली असे मात्र नाही. 
मायभूमीशी असलेले नाते कायम ठेवून अनेकांनी कर्तबगारीची अशीच झेप घेऊन 
दाखवली. कुणी मराठी मातीत केशर फुलवून दाखवला तर कुणी इथे रसरशीत फुले 
फुलवून विदेशी मार्केटमध्ये नियमितपणे विकण्याचा मार्ग दाखवून दिला. कुणी 
सुपर कंप्युटर बनवून दाखवला, कुणाची शँपेन पाश्चात्यांच्या सराईत 
जिव्हाग्रांनाही समृद्ध करून गेली, आजघडीला असे एकही क्षेत्र नाही, ज्यावर 
मराठी माणसांने आपल्या कर्तृत्वाची लखलखीत मुद्रा उमटवलेली नाही. मराठी 
पावलांनी ज्या ज्या नव्या प्रदेशात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा 
तेव्हा त्याची पावले आधी तिथे भक्कमपणे उभी राहिली आणि मग त्यांनी स्वतःची 
अशी वेगळी ओळख निश्चितपणे निर्माण केली.

नव्या महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेचा आम्हाला अभिमान आहे आणि तीच पताका 
खांद्यावर घेऊन मिरवण्याचे व्रत आम्ही घेतलेले आहे. अर्थात, हे करतानाही 
तुकोबारायांची शिकवण आमच्या मनावर बिंबलेली आहे
भले तो देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा

अस्सल मराठीपणाची हीदेखील एक खूण आहेच की! त्यामुळेच आमचाही निर्धार आहे, 
समाजातील जे जे उत्तम, उदात्त आणि सुंदर आहे त्याची पाठराखण करण्याचा आणि 
त्याचवेळी खोट्यांच्या कपाळी नेम धरून सोटा हाणण्याचाही.
अर्थात समाजाच्या हक्कासाठीच्या या लढ्यामध्ये सहभागी होताना तुमची साथही हवी
.

Wednesday, February 16, 2011


वेब्लोग ह्या शब्दाचे जनक जोर्न बारगर हे आहेत. हा शब्द त्यांनी १७ डिसेंबर १९९७ लाविकसीत केला. ह्या शब्दाचा संक्षिप्त शब्द म्हणजेच ब्लॉग ह्या शब्दासाठी मात्र पीटर मेर्होल्झ हे जवाबदार होते. मेर्होल्झ ह्यांनी विनोदात्पर वर्डवेब्लॉग हा शब्द फक्त दोन शब्दां म्हणजेच वी(we) ब्लॉग(blog) मध्ये तोडला आणि त्यांचा ब्लॉग म्हणजेच पीटरमी.कॉम च्या साईडबारवर प्रदर्शित केला. त्यानंतर थोडक्यात कालान्तारानं इवान विलीअं ह्यांनी पायीरा लॅब्स् येथे ब्लॉग हा शब्द नाम व क्रिया दोन्ही प्रकारे वापरला (लेब्लॉग म्हणजे एका वेब्लॉग मध्ये बदल करणं अथवा एक ब्लॉग पोस्ट करणे) आणि ब्लॉगर हा शब्द पायीरा लॅब्स् ब्लॉगर प्रोडक्ट ह्याप्रकारे विकसीत केला ज्यामुळे हे शब्द चांगलाच लोकप्रिय झाला.

[संपादन]