प्रवास- लोकशाही ते हुकूमशाही
बऱ्याच दिवस चाललेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाने बरेच
प्रश्न देखील निर्माण केले आहेत. त्यातच भारत कृषिप्रधान देश असूनदेखील शेतकऱ्यांबद्दलचा
सरकारला असलेला आदर तमाम देशातील जनतेने पहिला व पाहत आहेत. मग तो आंदोलन चिरडून टाकण्यासाठी
केलेला लाठीमार असो वा गोळीबार असो. हे सरकार आता लोकशाहीकडून हुकूमशाही कडे
वाटचाल करताना दिसते आहे. आपले लाडके व्यक्तिमत्व असलेले बाबा म्हणजेच मुख्यमंत्री
काही दिवसांपूर्वी म्हणाले- “उसाचे दर व सरकारचा काही संबंध नाही”. मग शेतीला
लागणाऱ्या सर्व रासायनिक खतांवरील शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी अनुदान का काढून
टाकण्यात आले? तसेच दिवसेंदिवस वाढणारे डीझेल व पेट्रोल वरील दर यामुळे उत्पादन
खर्चात झालेली वाढ, खतांच्या भरमसाट किमती या सारख्याच कित्येक गोष्टी व
त्यांच्याखाली नेहमी भरडला जाणाऱ्या शेतकऱ्याने उसाला दर वाढवून मागितला तर बिनसले
कुठे? यात भरीस भर म्हणून बारामती न्यायालयाने खा.राजू शेट्टी यांना केलेली
बारामती, इंदापूर, दौंड तालुका प्रवेश बंदी हे देखील सरकारच्या हुकुमशाही चे ऐक
उदाहरणच आहे. यामुळेच सरकारवर असलेला सर्वसामान्य जनतेचा व शेतकरी
बांधवांचा विश्वास कमी होतो आहे.
No comments:
Post a Comment