मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.(अयन=चलन/ढळणे) हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.
संक्रात समग्र दक्षिण पूर्व आशिया मध्ये थोडा स्थानिक फेरफार सोबत साजरी करतात.
- उतर भारतात,
- हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
- पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
- पूर्व भारतात,
- बिहार - संक्रान्ति
- आसाम - भोगाली बिहु, (Bhogali Bihu)
- पश्चिम बंगाल - मकर संक्रान्ति
- ओडिशा - मकर संक्रान्ति
- पश्चिम भारतात,
- गुजरात व राजस्थान - उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
गुजरातमध्ये या दिवशी धान्य,तळलेल्या मिठाया, खाद्यपदार्थ बनावले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.
- दक्षिण भारत,
- कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
- तमिळनाडू - पोंगल, (Pongal)
- शबरीमला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
- भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
- नेपाळमध्ये,
- थारू (Tharu) लोक - माघी
- अन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti) के माघ सक्राति (Maghe Sakrati)
- थायलंड - सोंग्क्रान (สงกรานต์ Songkran)
- लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
- म्यानमार - थिंगयान (Thingyan)

